Category: ताज्या बातम्या
-

मांजरम येथे शुक्रवारी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’.
नायगाव : बाळासाहेब पांडे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने नागरिकांच्या विविध महसुली अडचणी सोडवण्यासाठी मांजरम (ता. नायगाव) येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता कांत्याप्पा मठ, श्री हनुमान मंदिराच्या पाठीमागे पार पडणार आहे. या शिबिरात नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा…
-

जिल्हा बँकेच्या निवडणूक ठरावावेळी भिलवंडे समर्थकांचे दोन गट पुन्हा एकदा आमनेसामने
नायगाव : जिल्हा बँकेच्या मतदानाचा अधिकार बहाल करण्याच्या ठरावासाठी घेण्यात आलेल्या आमसभेत भिलवंडे समर्थकांचे दोन गट पुन्हा एकदा आमनेसामने आल्याने नरसी येथे १५एप्रिल रोजी वातावरण तणावपूर्ण बनले होते. कडेकोट पोलिस बंदोबस्तात पार पडलेल्या या सभेत मोठा गदारोळ झाला.जाग्यावर ठराव न घेता सभा तहकूब झाली. नरसी गावातील राजकारणात सक्रिय असलेल्या दोन्ही भिलवंडे गटांमध्ये आधीपासूनच मतभेद होते.…
-
अपहरणग्रस्त मुलीचा शोध घेऊन अपहरणकर्त्याविरुद्ध कारवाई करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन!.
माहूर : जयकुमार अडकिने अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा व अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करा या मागणीचा आग्रह धरून कुटुंबीय व नातेवाइकासह दि.१७ रोजी गोंडवडसा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे अपहरणग्रस्त मुलीच्या आईने उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांना दिले आहे. ५ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील एका गावातील कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीचे अपहरण…
-

नायगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य अन्नदान.
नायगाव प्रतिनिधी बाळासाहेब पांडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नायगाव शहरात भव्य अन्नदानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील मुख्य चौकात आयोजित या उपक्रमात खिचडीचे वाटप करून समाजसेवेचा आदर्श घालण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मिलिंद बच्चाव, सतिष वाघमारे, प्रकाशभाऊ हनमंते व साहेबराव कोपरेकर यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.…
-

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खीरदान ; श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सह खीरदान कार्यक्रम संपन्न
श्रीक्षेत्र माहूर : महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माहूर शहरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले तर तहसील कार्यालयाचा गेटवर असलेल्या स्वर्गीय पिपळी बाई पूरसिंग राठोड यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रशांत भाऊ राठोड यांनी उभारलेल्या श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथे संचालक विजय भाऊ कांबळे यांचे कडून जयंती साजरी करत आलेल्या सर्व नागरिकांना दिवसभर खीरदान करण्यात आले माहूर शहरात…
-

संत गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त कोलंबीत भव्य मूर्ती स्थापना व महाप्रसाद सोहळा.
नायगाव : वारकरी संप्रदायातील थोर संत श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोलंबी (ता. नायगाव, जि. नांदेड) येथे भव्य मूर्ती स्थापना व महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी, कोलंबी यांच्या वतीने करण्यात आले असून मूर्ती स्थापनेचा शुभारंभ…
-

आंतरगाव येथे अवैध वाळू उत्खनन सुरूच; महसूल प्रशासनाच्या मूक संमतीचा आरोप, कठोर कारवाईची मागणी.
नायगाव : बाळासाहेब पांडे नायगाव तालुक्यातील आंतरगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असतानाही महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अवैध उत्खननाला महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मूक संमती मिळत असल्याचा…
-

तांदळ्याच्या भूमिपुत्राची पुणे पोलिसात निवड ; पुण्यातील मित्रमंडळासह तांदळ्यात जल्लोष.
श्रीक्षेत्र माहूर माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या मौजे तांदळा येथील सय्यद हैदर सय्यद गणी यांची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी पुणे गाठून बिगारीचे काम सुरू केले अशा परिस्थितीतही त्यांनी त्यांचा मुलगा सय्यद सरवर शिकवून त्याची पुणे पोलिसात निवड झाल्याने पुण्यातील मित्रमंडळासह मौजे तांदळातील त्यांचे मित्र मंडळ नातलग गावकऱ्यातून आनंदोत्सव साजरा करून त्याचे अभिनंदन केले जात आहे…
-

१९ एप्रिल रोजी दत्तशिखर संस्थान येथे भव्य सत्संग.
माहूर – हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील दत्तात्रेय संस्थान शिखर चे महंत श्री श्री श्री १००८ महंत मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज(मालक) यांचे ४ एप्रिल रोजी महानिर्वाण झाले. दिनांक ५ एप्रिल रोजी विविध आखाड्याचे प्रतिनिधी साधू संत व महामंडलेश्वर व लाखो भाविकांच्या व विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत महंत श्री श्री श्री…
-
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के : नागरिकांना सतर्क राहण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन.
जयकुमार अडकिने नांदेड, दि.११ एप्रिल:- #नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर व ग्रामीण भाग, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील काही गावांमध्ये आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08:45 मी. वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली होती. त्यानुसार राष्ट्रीय #भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08.45…