Category: ताज्या बातम्या
-

माहूर येथे “ शिवाजी कोण होता ?” पुस्तकाचे जाहीर वाचन.
माहुर : माहूर- ४० वर्षापूर्वी कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले छत्रपती शिवरायांच्या अस्सल जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे “ शिवाजी कोण होता ? या पुस्तकाच्या शिर्षकावरून बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सध्याचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या आई व पत्नी बाबत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच नागपूर येथील एका जाहीर कार्यक्रमात धीरेंद्र बागेश्वर नावाच्या…
-

पंचायत राज दिनानिमित्त नरसी येथे बुद्धविहार सुशोभीकरण कामाचा शुभारंभ; महिलांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ.
नायगाव : नायगाव पंचायत राज दिनाच्या औचित्य साधून नरसी शहरात विकासकामांना गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. शहरातील बुद्धविहार येथे सुशोभीकरण कामाचा प्रारंभ कष्टकरी महिलांच्या शुभहस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे सामाजिक व धार्मिक स्थळाचे सौंदर्य वाढण्यासोबतच परिसराच्या एकूण विकासाला चालना मिळणार आहे. लोकप्रिय युवानेते खासदार रविंद्र पाटील चव्हाण यांच्या विकास निधीतून हे काम…
-

उत्सव संतांचा, कुंभमेळा वारकऱ्यांचा उपक्रम यशस्वीतेसाठी २६ एप्रिल रोजी नांदेडला बैठक.
नांदेड : बाळासाहेब पांडे उत्सव संताचा कुंभमेळा वारकऱ्यांचा हा उपक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला असून भव्य दिव्य कीर्तन महोत्सव, ११,००० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संतचरित्र कथा या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी २६ एप्रिल रोजी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. हा उत्सव ऐतिहासिक होण्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात येणार असून सर्वांना सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सदरील…
-

कॅम्पस मुलाखतीत कृषी महाविद्यालयाचा झेंडा उंचावला; 24 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड.
नायगाव : बाळासाहेब पांडे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय, नायगाव येथील विद्यार्थ्यांनी विविध कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. आयडियल अॅग्री सर्व्हिस प्रा. लि. या नामांकित कंपनीत 20 विद्यार्थ्यांची निवड झाली असून ग्रीन गोल्ड सीड्स प्रा. लि. मध्ये 4 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.ही कॅम्पस मुलाखत प्रक्रिया…
-
दिव्यांग अल्पवयीनमुलीवर अत्याचार; नायगाव तालुक्यातील नराधमाला २० वर्षे सश्रम कारावास.
नायगाव | बाळासाहेब पांडे दिव्यांग अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बिलोली येथील न्यायालयाने चांगलाच धडा शिकवला आहे. जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. ब. बोहरा यांनी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास व २७ हजार रुपये दंड ठोठावत कठोर संदेश दिला. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी नायगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे घडलेल्या…
-

वीज गेली की महावितरण गायब!”; नायगावकरांचा संताप ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर.
नायगाव, : बाळासाहेब पांडे उन्हाच्या कडाक्यात नागरिक हैराण असताना महावितरणच्या निष्क्रिय आणि बेफिकीर कारभारामुळे नायगाव शहरात संतापाचा उद्रेक होत आहे. कोणतीही पूर्वसूचना नाही, वेळेचा ठावठिकाणा नाही – वीजपुरवठा अक्षरशः लपंडाव खेळत आहे. दिवस-रात्र कधीही वीज गायब होत असल्याने नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. घरात पंखे बंद, कुलर बंद, पाणीपुरवठा ठप्प – उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना…
-

माहूर नगर पंचायतीत २ कोटींचा ‘घरकुल घोटाळा’; लाभार्थ्यांचे अनुदान लाटल्याचा आरोप.
माहूर : जयकुमार अडकिने माहूर नगर पंचायतीमध्ये ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत गोरगरीब लाभार्थ्यांसाठी आलेला तब्बल २ कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळवून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सन २०१७ ते २०२१ या कालावधीतील घरकुल लाभार्थ्यांचे हक्काचे अनुदान लाटल्याप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करून एसआयटी (SIT) किंवा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी…
-

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती नायगावात उत्साहात साजरी.
नायगाव नायगाव येथील बसवेश्वर महाराज चौकात जगद्गुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी उपस्थित राहून बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना मान्यवरांनी महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा उजाळा दिला. बाराव्या शतकातील महान समाजसुधारक म्हणून त्यांनी समता, बंधुता आणि…
-

श्रीक्षेत्र माहूरगडच्या विकासाला गती, ८२९ कोटींच्या कामांना लवकरच मंजुरी. पालकमंत्री अतुल सावे.
श्रीक्षेत्र माहूर : श्रीक्षेत्र माहूरगडच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या ८२९ कोटी रुपयांच्या कामांना लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे आश्वासन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिले. दि. १७ एप्रिल रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना ते बोलत होते. पालकमंत्री अतुल सावे यांनी आमदार भीमराव…
-

इजतगावमध्ये अवैध वाळू माफियावर पोलिसांचा मोठा प्रहार; उपविभागीय अधीक्षक श्याम पानेगावकर यांची गुरुवारी मध्यरात्री धडक कारवाई.
नायगाव : बाळासाहेब पांडे नायगाव तालुक्यातील इजतगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पोलिसांनी अखेर निर्णायक घाव घालत मोठी कारवाई केली. बिलोली उपविभागीय पोलिस अधीक्षक श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी मध्यरात्री छापा टाकत वाळू माफियांच्या ताफ्यावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली…