माहूर तालुक्यात धरती आबा जन भागीदारी अभियानाचा शुभारंभ!

माहूर तालुक्यात धरती आबा जन भागीदारी अभियानाचा शुभारंभ!

माहूर – तालुका प्रतिनिधी

मौंजे मच्छिंद्र पारडी ता. माहूर येथे जनजातीय गौरव वर्ष निमित्य धरतीआबा जनभागीदारी अभियान तहसिलदार मुगाजी काकडे यांचा उपस्थितीत उत्साहात दिनांक 16 रोजी पार पडला सदर अभियानात म. पारडी गावातील आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र ई प्रमाणपत्र नोंदणी, राशन नवीन कार्ड अर्ज दुरुस्ती अर्ज ,नाव कमी करणे अर्ज ,आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, बँकेचे जन धन खाते तयार करणे , agristack नोंदनी, अतिवृष्टी अनुदान ekyc करणे,रोजगार हमी योजना कार्ड नोंदणी व दुरुस्ती, आभा कार्ड नोंदणी,आरोग्य तपासणी इत्यादी कार्यक्रम सदर अभियानात घेण्यात आले सदर अभियानात महसूल विभाग ,आरोग्य विभाग,कृषी विभाग , पंचायत विभाग ,महिला व बाल कल्याण विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच सेतू चालक,आधार नोंदणी कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक, आजूबाजूचा गावातील सरपंच रहीवाशी ,गावकरी,महिला उपस्थित होते..