सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोनथुला यांनी केली अतिवृष्टीग्रस्त नुकसानीची पाहणी!.

माहूर – दिनांक 15 16 व 17 ऑगस्ट रोजी माहूर तालुक्यात अतिवृष्टीने व इसापूर धरणाचे गेट उघडल्याने आलेल्या महापुरात तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या गावच्या शिवारात शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. किनवटचे साहेब जिल्हा अधिकारी जेनित चंद्रा दोनथुला यांनी अंजनखेड, नाईकवाडी, सावरखेड, बोंडगावं, चौफुली येथे पिक नुकसान पाहणी करून गावकरी यांच्याशी चर्चा केली तसेच रुई,हाडसनी,इवळेश्वर,साकूर,(साकूर उच्च पातळी बंधारा ) अतिवृष्टीने,नदीने नुकसान झालेल्या पिकांचे नुकसाणीची पाहणी केली तहसीलदार अभिजीत जगताप, माहूर,कृषी सहायक,ग्राम महसूल अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक राजूरकर,ग्राम महसूल अधिकारी शितल राऊत,सि.पी.बाबर, अधिक कृषी व महसूल कर्मचारी यावेळी साहेब जिल्हाधिकारी यांच्या समवेत होते