Uncategorized

लोकनेते वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळवाटपनायगाव : नांदेड जिल्ह्याचे लोकनेते तथा दिवंगत खासदार स्व. वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त.

नायगाव : पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, नायगाव येथे रुग्णांना फळांचे वाटप करून सामाजिक उपक्रमातून अभिवादन करण्यात आले.यावेळी युवा नेते विराज विजय पाटील चव्हाण, नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण, समाजातील ज्येष्ठ शंकरमामा गोंटलावार, माधवराव नर्तावार, तुळशीराम बिरेवार, माधवराव बिरेवार, तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव चन्नावार, सचिव बालाजी वंगावार, मार्कण्डेयश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष गजानन गुरूपवार, सचिव साईनाथ आलेवार, प्रौढ जिल्हा कार्याध्यक्ष मोहनराव जोगेवार, सहसचिव माधवराव जलदेवार, युवक जिल्हा कार्याध्यक्ष साईनाथ चन्नावार, उपाध्यक्ष राजेश आलगटलेवार आदी उपस्थित होते.तसेच नरसिंग गोंटलावार, गंगाधर गोस्केवार, प्रल्हाद जलदेवार, पिराजी चन्नावार, पंढरी सदपनटनवार, यादव कोकुलवार, गजानन आडबलवार, मोहन माचनुरे, गंगाराम गोणेवार, अजय वंगरवार, पांडुरंग मलफेदवार, शिवाजी आरटवार, गोविंद जोरगूलवार, अंकुश चन्नावार यांच्यासह पत्रकार व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामाजिक बांधिलकी जपत जयंती साजरीलोकनेते स्व. वसंतराव चव्हाण यांनी समाजातील सर्वसामान्य घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविला. त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादन न करता रुग्णांना फळवाटपाचा सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या कार्याला मानवतावादी कृतीतून आदरांजली वाहण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button