
श्रीक्षेत्र माहूर ; जयकुमार अडकिने
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकाने चक्क दारूच्या नशेत विद्यार्थ्यांसमोरच डान्स करने.जोर जोराने रडने.असा प्रकार एका पालकाने आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून समाज माध्यमात व्हायरल केला आहे.या निंदनीय व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच पालकवर्गात संतापाची लाट उसळली असून शिक्षण विभागाच्या इभ्रतीचे वाभाडे निघाले आहे.
माहूर शहरापासून ७ किलोमीटर अंतरावरील शेकापूर गावातील जि.प. शाळेत दि .५ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रातच मुख्याध्यापकाने दारूचे सेवन करून मद्यधुंद अवस्थेत वर्गात प्रवेश केला.व्हायरल व्हिडिओत मुख्याध्यापक मोठमोठ्याने ओरडल्याचे व लटलटत नाचत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरले,काही विद्यार्थी भीतीने रडू लागले, तर काहींनी वर्गाबाहेर पळ काढल्याचेही व्हिडिओत दिसून येते. उपस्थित एका पालकाने हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून समाजमाध्यमांवर शेअर केला. काही क्षणांतच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.जि.प. शिक्षण विभागातील ही घटना उघड झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या गंभीर आणि लज्जास्पद कृत्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिस्तीचा, शिक्षण गुणवत्तेचा आणि शिक्षकवर्गाच्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.नशेत नाच करणाऱ्या मुख्याध्यापकाच्या निलंबनाचा प्रस्ताव सोमवारला दाखल केल्यानंतर लवकरच त्यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात येईल गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी सांगितले

