ताज्या बातम्यानांदेड

जनवादी लेखक संघाच्या नांदेड जिल्हा सचिव पदी प्रफुल्ल कऊडकर यांची निवड !.

माहुर : जयकुमार अडकिने

माहूर- दि. ०२ सप्टेंबर २०२५ रोजी नांदेड येथे जनवादी लेखक संघाची नांदेडात स्थापना करण्यात आली त्यामध्ये माहूर तालुक्यातील अभ्यासू जनवादी लेखक कॉ. प्रफुल कऊडकर यांची जिल्हा सचिव पदावर निवड करण्यात आली. यावेळी जनवादी, पुरोगामी अंगाने समता बंधुता,लोकशाही, धर्मनिरपेक्षता आदी मूल्यांचे लिखाण करणारे लेखक कवी तसेच बुद्धिजीवी यांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. उदय नारकर(कोल्हापूर)तसेच जनवादी चळवळीचे नेते कॉ.विजय गाभने ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. नांदेड मध्ये जिल्हास्तरीय जनवादी लेखक संघाची स्थापना करण्यात आली.या बैठकीत अध्यक्ष पदी प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले, कार्याध्यक्ष म्हणून कवी सुभाष बोड्डेवार, उपाध्यक्ष पदी अरुण दगडू, तर सचिव म्हणून प्रफुल्ल कऊडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!