
माहूर:- जयकुमार अडकिने
शिवसेना उ.बा.ठा चे माहूर शहरप्रमुख निरधारी जाधव यांचे ८ मे रोजी दुखःद निधन झाल्याने शोकसागरात बुडालेल्या वार्ड क्र. २ आबासाहेब पारवेकर नगर, वडरपुरा येथील नागरिकांनी दि. २१ मे रोजी वार्डातील चौकात श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सदर ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या हस्ते अण्णा चौकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी गौरव निरधारी जाधव, कृ.उ.बा.स उपसभापती अनिल रुणवाल, नगर सेवक विजय कामटकर शिवसेना युवती जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा तळणकर, माजी सभापती मारोती रेकुलवार शिवसेना सोशलमिडिया विधानसभा प्रमुख जितु चोले,विनोद पाटील सूर्यवंशी, नयनसिंह राठोड, गजानन चव्हाण, गणेश पुरी, राजाराम गंदेवाड, अशोक उप्पलवाड, ज्ञानेश्वर गुजलवाड, इसाये, आदीसह वार्ड क्र.२ मधील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात दिवंगत निरधारी जाधव यांच्यातील विविध गुणाचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

