श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने

माहूर तालुक्यातील नदीपत्रावरील पाचही वाळूघाट लिलावात बोली बोलून महसूल न भरल्याने पुन्हा लीलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने माहूर तालुक्यात वाळूचा तुटवडा जाणवत असल्याचा फायदा घेऊन काही वाळू तस्कर नाल्यातून वाळू चोरी करून विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत जगताप यांना मिळाल्याने त्यांनी दि 8 रोजी अर्ध्या रात्री नायब तहसीलदार कैलास जेठे सपोउपनि संदीप अन्येबोईनवाड यांचे सह कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथकाद्वारे एक ट्रॅक्टर वाळू भरून जात असताना पकडला तर दुसऱ्या घटनेत नाल्यावर ट्रॉली लावून वाळू भरत असेल असलेली ट्रॉली जप्त करण्यात आली असून दि 9 रोजी विनापरवानगी मुरमाची वाहतूक करणारा हयवा पकडल्याची घटना घडल्याने वाळू तस्करासह इतर गौण खनिजाची चोरी करणाऱ्यात घबराट पसरली आहे
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सहाय्यक जिल्हाधिकार जेनीत चंद्रा दोन्तूला उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजीत जगताप यांनी महसूल आणि पोलिसांचे संयुक्त पथक स्थापन करून पैनगंगा नदी पात्रावरील सर्व घाटावर करडी नजर ठेवली आहे त्यामुळे वाळू तस्करी पूर्णपणे बंद असून काही वाळू तस्कर नाल्यातील वाळू तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत असल्याने तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे हे स्वत दि 8 रोजी रात्री अकरा वाजता गस्तीवर असताना अंजनखेड ते रूपानाईक तांडा या रस्त्यावर पथकास सोनालीका ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून जात असताना दिसल्याने त्यास अडविले असता चालक ट्रॅक्टर थांबवू न पसार झाला त्या ट्रॅक्टरला माहूरच्या तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आले तर दुसऱ्या घटनेत अंजनखेड ते नाईकवाडी रस्त्यावरील नाल्यावर एका ट्रॉलीत मजूर वाळू भरत असलेले दिसल्याने तेथे वाहन थांबून बघितले असता मजुरांनी पोबारा केला तर दुसऱ्या ट्रॅक्टरचे मुंडके लावून सदरील ट्रॉली माहूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली तर तिसऱ्या घटनेत दि 9 रोजी पालाईगुडा फाटा येथे विनापरवानगी मुरमाची वाहतूक करत असलेला एसडी कंट्रक्शन कंपनी माहूर असे लिहिलेला हायवा क्रमांक MH 26CE 1771 या हायवाची चौकशी केली असता त्याचेजवळ कुठलीही परवानगी नसल्याने त्या हवालाही माहूरच्या तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आले आहे
सदरील धाडसी कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे सपोउपनी संदीप अन्येबोईनवाड पोका ज्ञानेश्वर खंदाडे महसूल सहाय्यक मनोहर चेके, सुनील वणवे, डी वाई एरडलावार सी पी बाबर, सुमित नैताम ग्राम महसूल अधिकारी बंडू चिरंगे, लक्ष्मण मेश्राम सुमित नैताम, प्रदीप कदम सर्व ग्राम महसूल अधिकारी, विवेक नागपुरे, पवन पाटील यांचे सह या कारवाईत सर्व महसूल अधिकारी कर्मचारी कोतवाल उपस्थित होते

