ताज्या बातम्यानांदेडनायगावराजकीय

लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज.

माजी राज्यमंत्री डाॅ.किन्हाळकर ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाची नायगांवात बैठक.

नायगांव :- बाळासाहेब पांडे

देश व राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेची होत असलेली पिळवणूक चिंतेची बाब असून लोकशाही संकटात आलेली असल्याने लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत माजी राज्यमंत्री डाॅ.माधवराव पाटील किन्हाळकर यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने नायगांवच्या अंबिका मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर,युवानेते शिरीष देशमुख गोरठेकर,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.प्रांजलीताई रावनगांवकर, जिल्हा सरचिटणीस प्रा.डि.बी.जांभरुणकर,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष रावनगांवकर,

जेष्ठ नागरिक आघाडी जिल्हाध्यक्ष इंजी.भोसीकर, विनायकराव शिंदे,गजानन पांपटवार,अल्पसंख्याकचे प्रा.मजरोद्दीन,ओबीसी सेलचे शिवकुमार देवकते,विद्यार्थी आघाडीचे अजिंक्यराजे देशमुख,सेवादलचे पुंडलिक नव्हारे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून पक्षाची तालुक्यातील सद्यस्थिती व पूढील भूमिका विषद केली.   सुत्रसंचालन राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे यांनी केले.      जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगांवकर,युवानेते शिरीष गोरठेकर,सौ.प्रांजलीताई रावनगांवकर आदींनी यावेळी मार्गदर्शन केले.

यावेळी पूढे बोलतांना माजी राज्यमंत्री किन्हाळकर म्हणाले की,सत्ताधाऱ्यांकडून देशातील जनतेला विविध योजनांची आमिषे दाखविली जात असून एकही योजना योग्यतेने राबविली जात नाही.लाडकी बहिण,आनंदाचा शिधा,प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईन प्रक्रिया आदींच्या माध्यमातून येथील जनतेची सक्षमता हिरावून घेतली जात असून सत्ताधाऱ्यांकडून अदानी व अंबानीच्या अधिपत्याखाली आपली पिळवणूक सुरु आहे. मात्र याबाबत कोणीही बोलत नाहीत हि चिंतेची बाब आहे. पून्हा एकदा आम्हाला पारतंत्र्यात टाकून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न होत असल्याने याबाबत सर्वसामान्य जनतेत जागृती निर्माण करुन लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजूटीने रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे सांगून त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. तसेच,शिव-फुले-शाहू- आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा रुजविण्याचे काम सातत्याने पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार करीत आहेत.शेतकरी, महिला,युवा आदी प्रत्येक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य- कर्तव्य व पक्षाची विचारधारा सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.

यावेळी उत्तम पा.शेळगांवकर, संजय पा.चव्हाण, शहाजी कदम,बालाजी कदम ,संभाजी पाटील, चांदपाशा,शेख मोहद्दीन,माधव देवकर, किसन पाटील,साहेबराव चट्टे, आदींसह तालुक्यातील पक्षातील पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

गोविंद पानसरे लिखीत शिवाजी कोण होता ? हा ग्रंथाच्या प्रती तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी व भारतीय संविधान गौरव दिन अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त भारतीय संविधान प्रास्ताविका प्रती राष्ट्रवादी किसान सभेचे मा. प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे यांनी उपस्थित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना यावेळी भेट दिल्या.

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!