नायगाव.
: मुकनायक वाचनालय मांजरम आणि सप्तरंगी साहित्य मंडळ, नांदेड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कै .माधवराव शिंदे गुरुजी साहित्य नगरी, मांजरम येथे करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून साहित्य, विचार आणि संस्कृतीची समृद्ध मेजवानी साहित्यप्रेमींना अनुभवता येणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन उद्योजक बालाजी बचेवार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. रामकृष्ण बदने राहणार आहेत. विशेष प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर ,पोलिस उपअधीक्षक बिलोली श्याम पानेगावकर साहेब,आणि रिपाईचे राज्याध्यक्ष मधुकर मांजरमकर यांच्या सह अनेक मान्यवर यांची उपस्थिती राहणार आहे. .
संमेलनात मुक नायक वाचनालयाचे मुख्य सूत्रधार डी. के.वाघमारे गुरुजी यांना जीवन गौरव पुरस्कार,जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांना राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार,भीमराव तरटे
जगनराव गोणारकर, साहेबराव देवदे,प्रा. संजयकुमार मांजरमकर,प्रा. गजानन देवकर ; बळीराम नव्हारे गुरुजी,शिवाजी शिंदे ,शंकर माने वजीरगावकर
शिवाजी मलदोडे,संजय पाटील
,श्रीकांत गोणारकर, कपिल डूमणे, विलास शिंदे,किशोर वाघमारे बारूळकर,माधुरी पिंगळे,शेख आरीफ,अंजली मुनेश्वर या सह उत्कृष्ट साहित्य, पत्रकारिता, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
कै.भाई दिगंबर शिंदे विचार मंच या वर सदर होणाऱ्या साहित्य संमेलनात काव्यवाचन, परिसंवाद, ठराव वाचन आणि समारोप असे विविध कार्यक्रम दिवसभर पार पडणार आहेत. समारोप प्रसंगी प्रा. प्रल्हाद हिंगोले, प्रा. डॉ. रामकृष्ण बदने आणि आयोजक जीवन मांजरमकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने होणार असून सकाळी १० वाजता चित्र व नाणे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता विचारमंचाचे उद्घाटन ,उद्घाटन कार्यक्रम पुरस्कार वितरण होणार आहे
. दुपारी १.३० वाजता मध्यंतर
दुपारच्या सत्रात २.३० वाजता परिसंवाद, ४ वाजता कथाकथन, सायंकाळी ६ वाजता नामवंत गझलकारांच्या सहभागाने गझल संध्या, तर रात्री ७ वाजता राज्यातील विविध भागांतील कवींच्या सहभागातून कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन व साहित्य महोत्सवाला साहित्यिक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन स्वागताध्यक्ष सचिन कांबळे,आदर्श शिक्षक शिवाजी कोंकेवाड,आयोजक जीवन मांजरमकर मुकनायक वाचनालय मांजरम आणि जिल्हाध्यक्ष रणजीत गोनारकर व सर्व पदाधिकारी सप्तरंगी साहित्य मंडळ, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

