
श्री महारुद्र रोकडेश्वर महाराज दिंडी आपादी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे यंदा दहावे वर्ष साजरे होत आहे. यानिमित्त दिंडीचे प्रस्थान मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता होणार असून, आळंदी ते पंढरपूर हा पारंपरिक पायी वारीचा प्रवास मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे.
यंदाच्या वारीचा मार्ग राटोळी–नायगाव–औंढा नागनाथ–परभणी–गंगाखेड–पुणतांबा–श्रीक्षेत्र आळंदी असा राहणार असून, श्रीक्षेत्र आळंदी येथे देवदर्शन करून दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दि. २६ जुलै २०२६ रोजी गोपाळकाला उत्सवानंतर दिंडीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
दिंडीचे मालक श्रीहरी शिवाजीराव पाटील राटोळीकर असून, यंदाच्या वारीसाठी दररोजच्या मुक्कामाची, भोजन व्यवस्थेची तसेच सेवेकऱ्यांची सविस्तर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विविध गावांतील भाविकांनी भोजन व निवासाची सेवा स्वीकारून वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला आहे.
वारीदरम्यान हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, प्रवचन, अभंगगायन आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार आहे. हजारो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी या दिंडीत सहभागी होणार असल्याने आयोजन समितीने सर्व आवश्यक नियोजन पूर्ण केले आहे.
दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी दिंडीचे नियम, शिस्त आणि स्वच्छतेचे पालन करावे, तसेच आयोजकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून वारी यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दिंडीसाठी प्रमुख मानकरी, सहकारी, सेवेकरी, कीर्तनकार, मृदंगवादक, टाळकरी आणि वारकरी मंडळी यांचे सहकार्य लाभत असून, या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्तरातून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१५६८०८०८२ / ७५८८६३२७११ / ९९२१४६२३७२



