Category: ताज्या बातम्या
-

कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचाराचा ‘पूर’ ; निकृष्ट कामांमुळे शेतकरी संतप्त;नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा १ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा.
नायगाव :बाळासाहेब पांडे कोलंबी जलउपसा सिंचन प्रकल्पातील निकृष्ट व अपुऱ्या कामांविरोधात परिसरातील शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आला असून, प्रकल्पातील त्रुटी तात्काळ दूर करून कामे पूर्ण न झाल्यास येत्या १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या या प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च…
-

साईनाथ महाराजांनी घेतलेला वसा जगाला प्रेरणा देईल : श्री देवदेवेश्वर संस्थानचे महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांचे प्रतिपादन.
जयकुमार अडकिने : श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे अधिक मास (धोंडे पुरुषोत्तम मास) निमित्त दि. 17 मेपासून सुरू असलेल्या भव्य चुलबंद धोंडे जेवण महाअन्नदान कार्यक्रमास भगवान श्री दत्तप्रभूंचे निद्रास्थान असलेल्या श्री देवदेवेश्वर संस्थानचे महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर…
-

नायगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी सतीश लोकमनवार, गणेश नायगावकर बिनविरोध.
नायगाव : बाळासाहेब पांडे शहराच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून नायगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी सतीश लोकमनवार आणि गणेश नायगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नगरपंचायतीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. नगरपंचायतीच्या सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन शुक्रवार २२ मे रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते. या…
-

गॅस वितरणाच्या संतापातून नायगावात चक्काजाम ; रिकाम्या टाक्या रस्त्यावर फेकून नागरिकांचे आंदोलन; नांदेड-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प.
नायगाव : नायगाव शहरातील डॉ. हेडगेवार चौक येथे गॅस वितरणातील विलंबामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज सकाळी अचानक चक्काजाम आंदोलन छेडल्याने नांदेड-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णतः विस्कळीत झाली. रिकाम्या गॅस टाक्या थेट रस्त्यावर टाकून नागरिकांनी रास्ता रोको केल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आज सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन…
-

महिला सक्षमीकरणात महाराजांचे कार्य कौतुकास्पद ; तृप्ती ताई देसाई यांचे प्रतिपादन ..
आनंद दत्तधाम आश्रम येथे अधिक मास निमित्त सुरू झालेल्या चूलबंद धोंडे जेवण महापंगत महाअन्नदानास तृप्ती ताई देसाई यांची उपस्थिती . श्रीक्षेत्र माहूर माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे अधिक मास धोंड्याच्या महिन्या निमित्त आश्रमाचे मठाधिश राष्ट्रसंत द भ प साईनाथ महाराज वसमतकर यांचे पुढाकारातून दरवर्षी अन्नदान होतो यावर्षी धोंडे जेवण महाअन्नदान महापंगत चूल बंद…
-

हुस्सा येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन सुरू.
आडकिने शंकर पाटील हुस्सा परिसरातील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नदी पात्रात तराफा व पाईपच्या साहाय्याने दोन ठिकाणी रेती उपसा केला जात आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या उत्खननामुळे नदीच्या नैसर्गिक…
-

मौत का कुआं’ ठरलेल्या हेडगेवार चौकातील खड्डे बुजवण्यास पुन्हा वेग; तांत्रिक अडचणी नंतर पाच दिवसांच्या खंडानंतर कामाला नव्याने गती
नायगाव : बाळासाहेब पांडे नांदेड–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नायगाव शहरातील अतिवर्दळीचा डॉ. हेडगेवार चौक गेल्या काही महिन्यांपासून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत होता. या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, काही तांत्रिक अडचणींमुळे तब्बल पाच दिवस बंद पडलेले खड्डे बुजवण्याचे काम अखेर पुन्हा एकदा मोरे यांना शब्द दिल्या प्रमाणे १५…
-

माहूर तालुक्यात जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाचे आदेश.
माहूर : जयकुमार अडकिने नाशिकच्या कुचर्चित अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात भोंदू बाबांचे पीक आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. देवासोबत संवाद असल्याचे सांगून किंवा चमत्काराचा दावा करून महिलांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण करणाऱ्या अशा भोंदूगिरीला पायबंद घालण्यासाठी आता माहूर प्रशासन आक्रमक झाले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पाठपुराव्यानंतर, माहूरचे गटविकास अधिकारी (BDO) यांनी तालुक्यातील…
-

कष्टकरी कुटुंबियांच्या मुलाने PSI पद गाठले!
नायगाव : बाळासाहेब पांडे नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील जिद्दी युवक ज्ञानेश्वर शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे आंतरगावसह संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत…
-

कंस्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झोपलेल्या निष्पाप ऑपरेटरचा मातीच्या ढिगा-याखाली दबून मृत्यू ; घात की अपघात..? चर्चेला उधान..!
माहूर : जयकुमार अडकिने कंस्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झोपलेल्या शिष्पाप ऑपरेटरचा मातीच्या ढिगा-याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना माहूर तालुक्यातील जुनापाणी नजीकच्या शारदा कंस्ट्रक्शन कंपनीच्या साईटवर आज सकाळी उघडकीस आली असून या घटनेत निष्पाप मजूर ऑपरेटरचा बळी गेल्याने हा प्रकार घात की अपघात याबाबतच्या चर्चेला पेव फुटले आहे…. माहूर तालुक्यातील मौजे जुनापाणी नजीक असलेल्या शारदा कंस्ट्रक्शन कंपनीच्या…