
कुंटूर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांवर गुन्हा ; ३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन दुचाकी, मोबाईलसह रोकड हस्तगत.
नायगाव : बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यातील सुजलेगाव शेतशिवार, ता. नायगाव येथे सुरू असलेल्या ‘तिर्रट’ नावाच्या जुगार अड्ड्यावर कुंटूर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम, दोन दुचाकी, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नांदेड जिल्ह्यात जुगार, मटका व इतर अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत ८ ऑगस्ट रोजी कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.कुंटूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना गुप्त बातमीदारामार्फत सुजलेगाव शेतशिवारात काही इसम ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिस निरीक्षक भोसले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचांसमक्ष सापळा रचून कारवाई केली असता संशयित जुगार खेळताना आढळून आले.या कारवाईत पाच जनांना ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी संशयितांकडून रोख २१ हजार ७०० रुपये, दोन मोटारसायकली व एक बुलेट (किंमत २ लाख २० हजार रुपये), चार मोबाईल (किंमत ७२ हजार रुपये) तसेच जुगाराचे साहित्य, असा एकूण ३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला.या प्रकरणी कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०३/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, सपोनि भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कांबळे, पवार पोहेकॉ, सप्रिल हंबर्डे व कुंटूर पोलिस ठाण्यातील नियुक्त पोलिस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणलेजुगार, मटका, अवैध दारू, अमली पदार्थ तसेच इतर अवैध धंद्यांविरोधात नांदेड जिल्हा पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात असे अवैध प्रकार सुरू असल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.


