ताज्या बातम्यानांदेडनायगाव

कुंटूर परिसरातील “उमेद “भरारी महिलांना देते बळ : “लखपती दीदी “झाल्या महिला सक्षमीकरणास महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची साथ..

कुंटूर :

नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या नारीशक्ती महिला प्रभाग संघाचे कार्य एक पाऊल आर्थिक उन्नती कडे दिसून येत आहे . यामध्ये नारीशक्ती महिला प्रभाग संघ कुंटूर अंतर्गत एकूण 23 गावांमध्ये शंभरच्या वर महिला बचत गट स्थापन करण्यात आले आहे. त्या महिला बचत गटा अंतर्गत गावागावात ग्रामसंघ तयार करून महिला बचत गटांना बळ व त्यांना आर्थिक उलाढालेसाठी बँकेची साथ त्यातच पंचायत समिती अंतर्गत उमेद अभियानाची हात दिल्यानंतर महिलांनी आपल्या उद्योग व्यवसायाला सुरुवात केली. कुंटूर येथे आज 74 महिला बचत गट स्थापना असून प्रत्येक महिला बचत गटाला दहा लाखाचे कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून दिल्यानंतर महिलांनी आपापल्या व्यवसाय उद्योगाला सुरुवात करून एक पाऊल सक्षमीकरणाकडे नेत आहेत .त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे कुंटूर ची घोंगडी हे महाराष्ट्रात नंबर एक ला आली असून दूध व्यवसाय शेळीपालन महिला सक्षमीकरणासाठी पर्यायी मार्ग ठरला आहे. महिला बचत गट स्थापन करून महिलांना सक्षमीकरणाचे धडे देत महिलांना स्वावलंबी बनवणे व त्या महिलांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग सुकर करण्याचे सात हे प्रमुख महिला समूह संसाधन व्यक्ती यांच्या कार्याचे प्रतिक मानले जाते. गावागावात महिला सक्षमीकरण करण्यासाठी ग्राम सखी यांची कार्य मोलाची असून परिसरात सौ. रेखाताई अनिल कांबळे यांनी कुंटूर येथील 74 महिला बचत गटांना सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्यास सहकार्य केले हे उत्कृष्ट कार्य जागतिक महिला दिनानिमित्त परिचितअसावे आहे.

ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण (Rural Women Empowerment) म्हणजे ग्रामीण महिलांना सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. यामध्ये महिलांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणे आणि त्यांना समान हक्क मिळवून देणे समाविष्ट आहे. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी खालील प्रमुख बाबी महत्त्वाच्या आहेत:

ग्रामीण महिला सक्षमीकरणाचे प्रमुख पैलू:

आर्थिक स्वावलंबन: ग्रामीण भागातील महिलांना उद्योजिका बनवण्यासाठी स्वयंसहाय्य गट (SHG – Self Help Groups) महत्त्वाची भूमिका बजावतात. या गटांद्वारे महिलांना छोटे उद्योग (उदा. पापड, लोणचे, शिलाई, हस्तकला) सुरू करण्यासाठी कर्ज आणि प्रशिक्षण मिळते.

शिक्षण आणि कौशल्य विकास: महिलांचे साक्षरता प्रमाण वाढवणे आणि त्यांना तंत्रज्ञान, डिजिटल साक्षरता व शेतीपूरक व्यवसायांचे प्रशिक्षण देणे, ज्यामुळे त्या रोजगाराच्या संधी शोधू शकतील.

राजकीय सहभाग (ग्राम पंचायत): महिलांना ‘महिला सभे’द्वारे ग्रामसभेत आपल्या गरजा मांडण्याची आणि ग्राम विकासात निर्णय घेण्याची संधी मिळते. ‘महिला-अनुकूल ग्रामपंचायत’ उपक्रम महिलांचे नेतृत्व वाढवण्यास मदत करतात.

आरोग्य आणि कायदेशीर जनजागृती: ग्रामीण महिलांना आरोग्य सुविधा, पोषण आणि महिलांवरील अत्याचाराविरुद्ध कायदे (POCSO, घरगुती हिंसाचार कायदा) याबद्दल जागरूक करणे.शासकीय योजना: ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण योजना’ सारख्या योजनांद्वारे महिलांना आर्थिक मदत आणि पाठबळ दिले जाते.

महिला सक्षमीकरणाचे फायदे:कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढते.: सामाजिक असमानता कमी होऊन लिंग समानता (Gender Equality) येते.

महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि निर्णय क्षमतेत वाढ होते. ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण हे केवळ त्या महिलांच्या विकासासाठी नाही, तर संपूर्ण गाव आणि राष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक आहे. असे मत कुंटूर येथील समूह संसाधन व्यक्ती ( ग्रामसखी) रेखाताई अनिल कांबळे यांनी व्यक्त केले. कुंटूर परिसरातील महिला उद्योग व्यवसायाकडे वळले असून त्यांना बँक व पंचायत समिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियानाची चांगलीच साथ मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!